नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात १८ ते २३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत ‘जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी व राज्यातील महसुली विभागाची मुख्यालये व साडेतीन शक्तीपीठे याठिकाणी महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथे २१ ऑक्टोबर रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत मंगल कार्यालय (यश लॉन्स), वणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामधून राज्य शासनाच्या महिला विषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे देखील सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.