नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मार्च २०२४ महिन्यासाठी (तात्पुरता) २०१२=१०० हा पाया मानून त्यावर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि ग्रामीण (आर), शहरी (यू ) आणि एकत्रित ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (सीएफपीआय) जारी केला आहे. अखिल भारत आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-समूह आणि गटांसाठी देखील सीपीआय जारी केले जात आहेत.
भारतातील किरकोळ महागाई दर मार्चमध्ये वार्षिक आधारावर ४.८५ टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील महिन्यात ५.०९ टक्क्यांवर होता.
औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले, जे आधीच्या महिन्यात ४.२ टक्के होते.