मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ईडी चौकशीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अमीत साटम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत असल्याची टीका केली आहे.
गजानन कीर्तिकर यांनी आता ईडीचा वापर थांबवा, त्याला लोक कंटाळली आहेत, चीड निर्माण झाली असे सांगत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आमदार साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले असे वाटते की, गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहे. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले.
ईडी पासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचाऱ्यांना आहे. जर कर नाही तर डर कशाला? अमोल किर्तीकर यांच्या अकाउंट मध्ये खिचडीच्या कंत्राटदाराकडून ९५ लाख रुपये आलेच का? याचे उत्तर द्यावे! भ्रष्टाचारियो की खैर नही! कार्यवाही तो होगी ही…