सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गुरुवारी एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आज सयाजीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सांगितले की, नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतात, आता काळजी करण्यासारखं काही नाही, लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन धन्यवाद…
सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. ज्यात त्यांच्या हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्यानंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आ्ल्याचे डॅीक्टरांनी सांगितले. त्यांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.