नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली या पाहणी मध्ये त्यांनी अतिदक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग त्याचबरोबर मला रुग्ण विभाग यांना भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर रुग्णांची चौकशी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व करण्यात आलेल्या बदलांबद्दल माहिती दिली.
जिल्हा रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्ण विभाग त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. तृतीयपंथीय रुग्णांची अडचण समजून घेत जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे, आठवड्याभरात हा कक्ष कार्यान्वित होणार आहे या कक्षाची देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी केली त्याचबरोबर रेडिओलॉजी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील या बदलांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अभिनंदन केले असून पुढील काळात माता व बालसंगोपन विभाग देखील त्वरित कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना यावेळी केल्या.
२०१७ साली तयार करण्यात जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारत ही कोरोना काळात वापरण्यात आली होती, कोविड काळात या इमारतीचा वापर करण्यात आला त्यानंतर ही इमारत वापरात नव्हती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर इमारतीचा वापर पुनश्च एकदा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी यावेळी दिली.