मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नकली सेना म्हणणाऱ्यांनी तुमचा इतिहास तपासून पहा. तुमचेच तत्कालीन अध्यक्ष त्यावेळी मातोश्रीवर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला लोटांगण घालायला आले होते असे सांगत उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार टीका केली. आता भाजपसोबत जो चायनीज माल आहे, त्यात सुख माना. तुमचं सुख तुम्हाला लख लाभ असो!
महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपला शिवसेना गुजरातला पळवून न्यायची होती, ती मी पळवू दिली नाही. भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे! यावेळी त्यांनी माझं आव्हान, मला संपवून दाखवा असे सांगितले.
लोकांचे ८ हजार कोटी खाऊन बसलात, पीएम केअर फंडचा घोटाळा काय आहे हे अगोदर सांगा असेही त्यांनी सांगितले. ही सभा बघा लाईव्ह….