नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात दिवा लावत असतांना गंभीर भाजलेल्या ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या डिसेंबर महिन्यात कोणार्क नगर भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनिषा महेशकुमार शिपानकर (रा.खंडोबा मंदिराजवळ,कोनार्क नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. शिपानकर या २१ डिसेंबर रोजी रात्री आपल्या राहत्या घरात दिवा लावत असतांना ही घटना घडली होती. साडीचा पदर दिव्यावर पडल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. पुणे येथील ससून रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.