इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभागाने ७.९४ किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले. ९ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ४ कोटी ६९ लाख जप्त केलेल्या सोन्याची किंमत आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पॅक्स बॉडी, ट्रॉली बॅग आणि गुदाशयात हे सोने लपवून ठेवलेले होते. एका प्रकरणात पॅक्सने विमानतळ कर्मचाऱ्यांना सोने सुपूर्द केले. चौघांना अटक करण्यात आली आहे. ८ ते १० एप्रिल दरम्यान ही कारवाई करण्यात आली.