येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणी कृत व्यापाऱ्यांचा संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खासगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र या उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला. यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व दीपक सोनवणे यांना जमाव मधील काहींनी धक्काबुक्की देखील केलीय
त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे फौज फाटासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.