ं
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महादेववाडी भागात रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी १९ वर्षीय परप्रांतीय तरूणास बेड्या ठोकल्या. धनु उर्फ साहिद हुसैन मुन्ना अली (मुळ रा. बिहार हल्ली महादेववाडी सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांच्या लैगिंक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि.१०) रात्री ही घटना घडली.
पीडिता घरपरिसरातून रस्त्याने पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडवित विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.