इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत निवडणुका जिंकता न आल्याने भाजप दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट रचत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याबाबबतची चिन्हेही स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक, त्यानंतर
मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाची हकालपट्टी, मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना अधिकारी उपस्थित राहत नाहीत, LG ने दिल्ली सरकारच्या विरोधात गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.
आपने याचे उत्तर जनता नक्कीच देईल असेही म्हटले आहे. आप व भाजपमधील संघर्ष सुरु असतांना आपने हा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारला कमकुवत करण्याचे काम केंद्राकडून सुरु असल्यामुळे आपने ही भिती व्यक्त केली आहे.