इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आपल्या पक्षाचा मताचा टक्का वाढवण्यासाठी फारतर आवाहन केले जाते. पण भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी चक्क दमच भरला. ते म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्गंमधून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. ज्या गावात कमी मताधिक्य मिळेल, तिथल्या सरपंचांना हिशेब द्यावा लागेल. कमी मताधिक्य देणाऱ्या गावांना विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
खंर तर अजून नाराणय राणे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. दुसरीकडे या जागेवरुन महायुतीत तिढा आहे. असे असतांना राणे कुटुंबाने प्रचाराला सुरुवात केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये त्यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. यावेळी मंत्री नारायण राणे उपस्थित होते. या वेळी नीतेश राणे म्हणाले, की जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर असतील तेव्हा ८० ते ८५ टक्के मतदान आपल्याला करायचे आहे. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली, तीच यंत्रणा आता लावा. येत्या चार जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे.
या वेळी नारायण राणे म्हणाले, की मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लोकांना घाई झाली आहे. उमेदवार जाहीर होण्याआधी आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदी यांच्या बाजूने वन साईड मतदान करण्याची विनंती या मेळाव्यातून करतो. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.