इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मासिक करदात्यांना GSTR-1 रिटर्न हे प्रत्येक महिन्यात भरावे लागत असते. त्याकरिता प्रत्येक महिन्याची देय तारीख ही ११ असून मुदतीत रिटर्न भरले न गेल्यास करदात्यांना प्रत्येकी दिवसाप्रमाणे विलंब शुल्क भरावा लागत असतो. परंतु गेली दोन दिवसांपासून वस्तू आणि सेवा कर विभागाच्या संकेतस्थाळावर तांत्रिक समस्यांमुळे पोर्टलवर काम करण्यास वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने करदात्यांना त्यांचे काम मुदतीत करता येणे शक्य होत नसल्याचे GSTN च्या निदर्शनास आले असून त्यानुसार CBIC ला शिफारस करण्यात आली होती की, मासिक करदात्यांना GSTR-1 भरण्याची देय तारीख एका दिवसाने म्हणजे १२/०४/२०२४ पर्यंत वाढवण्यात यावी. त्याची दखल घेत मासिक करदात्यांना GSTR-1 भरण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवली आहे. याबाबतची अधिकृत माहिती वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकृत संकेतस्थाळावर https://www.gst.gov.in देण्यात आली असल्याची माहिती कर सल्लगार योगेश कातकाडे यांनी दिली असून करदात्यानां विलंब शुल्क पासून निश्चित होता येणार असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.