नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना, दुसरी नकली राष्ट्रवादी आणि एक आर्धी उरलेली काँग्रेस. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा, काम बिघाडा. मी आपल्याला सांगायला आलोय की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला आर्धे करण्याचे काम केले असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. यावेळी पुढे ते म्हणाले की, हे तीन आर्धे मिळून महाराष्ट्राचे भले करतील का? ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचे आहे, गिअरबॉक्स फियाटचे आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचे आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
बघा अमित शाह यांची संपूर्ण सभा….