बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपूरला पावसात निघाली गडकरींची लोकसंवाद यात्रा…

by India Darpan
एप्रिल 11, 2024 | 8:28 pm
in संमिश्र वार्ता
0
DSC 9735

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अकाली पावसामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करीत उत्तर नागपुरातील नागरिकांनी उत्साह दाखवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दणदणीत स्वागत केले आणि यात्रा यशस्वी केली.

बुधवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे लोकसंवाद यात्रेबद्दल काहीशी अनिश्चितता होती. मात्र, नागरिकांच्या उत्साहावर पावसाचा काहीही परिणाम झाला नाही आणि भर पावसात गडकरींची लोकसंवाद यात्रा उत्तर नागपुरात दाखल झाली. नागरिकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला. सकाळी दहाच्या सुमारास टेका नाका येथील बाबा बुद्धाजी नगरमध्ये गडकरी दाखल झाले. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार गिरीश व्यास, वीरेंद्र कुकरेजा आदींची उपस्थिती होती. गुरुद्वारा श्री तेग बहादूर साहिब येथे दर्शन घेऊन नितीनजींनी यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ नगर, नई बस्ती या मार्गाने फारुख नगर व महेंद्र नगर येथे यात्रा पोहोचली. याठिकाणी ना. श्री. नितीन गडकरी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

जागोजागी नागरिकांकडून पुष्पवर्षाव करण्यात आला. सर्व वस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक ना. श्री. गडकरी यांना भेटण्यासाठी उत्साहाने पुढे आले. प्रचार रथाचे स्वागत करतानाच गडकरी यांना निवडणुकीतील दमदार विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या. यशोदीप कॉलनी, मोहम्मद रफी चौक, यादव नगर, जयभीम चौक, राणी दुर्गावती चौक, पंचशील नगर, वैशाली नगर सिमेंट रोड, जय श्रीराम चौक, शाहू मोहोल्ला, वनदेवी नगर, लाल झेंडा चौक, यशोधरा चौक, टिपू सुल्तान चौक, संघर्ष नगर, रिंग रोड, एकता कॉलनी या मार्गाने ऑटोमोटिव्ह चौकाजवळ यात्रेचा समारोप झाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…पाथर्डी फाटा परिसरातील घटना

Next Post

पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकू… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

India Darpan

Next Post
GK5C9EpawAAZsXh

पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकू… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011