नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी फाटा परिसरातील सुखदेवनगर भागात राहणा-या १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दया गोपीनाथ क्षत्रीय असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. दया क्षत्रीय या युवकाने गेल्या रविवारी (दि.७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या सिग्नस हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
उपचार सुरू असतांना डॉ. पुष्कराज भोळे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.किरण पाटील यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.