इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः नमाज पठण करून येणाऱ्या चौघांसह एका महिलेचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये झाली. पिलीभीत-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ११ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले.
डंपर चालकाचे नियंत्रण सुटले. डंपरखाली दोन्ही दुचाकीस्वार चिरडले. घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी पाचही जणांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. जहानाबाद इडोली येथील उवैश, अरबाज आणि त्याची पत्नी शक्रा बेगम, आकिब मुलगा हसिम खान साहब हे दुचाकीवरून घरी परतत होते. तीन तरुण नमाज अदा करून मशिदीतून येत होते. याशिवाय पिलीभीत-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर एक पुरुष आणि एक महिलाही दुसऱ्या दुचाकीवरून येत होते. त्यावेळेस डंपरने धडक दिली.
या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी महामार्ग रोखून धरला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. ईदच्या सणाच्या दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी संतप्त भावना व्यक्त केला.