नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर गावात रस्त्याने पायी जाणा-या दोघी मैत्रीणींना गाठून एकाने त्यांचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल रमेश काळे (रा.सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची मैत्रीण बुधवारी (दि.१०) रात्री सातपूर गावातून रस्त्याने पायी जात असतांना संशयिताने गर्दीची संधी साधत त्यांचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.