मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- धुळे लोकसभेच्या काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या डॉ.शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला नाशिकच्या मालेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. डॉ.बच्छाव या नाराज डॉ.तुषार शेवाळे यांच्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या असतांना ‘ आयात उमेदवार चालणार नाही. शोभा बच्छाव परत जा अशी जोरदार घोषणाबाजी बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी केली.
डॉ.तुषार शेवाळे यांना उमेदवारी द्या..तुमची उमेदवारी रद्द करा..अशी आग्रही मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी डॉ.शोभा बच्छाव यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यकर्त्यांची रोष पाहून डॉ. शोभा बच्छाव यांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागले.
यावेळी डॉ.शोभा बच्छाव व त्यांचे पती डॉ.दिनेश बच्छाव यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. डॉ.बच्छाव यांची उमेदवारी रद्द करून डॉ. शेवाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.