नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बारा लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक वादातून एकाने शिवीगाळ व दमदाटी करीत ही खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.
वैभव यादवराव देवरे (रा.सिमा अपा.चेतनानगर) असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत विजय भालचंद्र खानकरी (रा.मुरलीधर हाईटस,गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित देवरे गेल्या डिसेंबर पासून खानकरी यांना खडणीसाठी त्रास देत असून, वारंवार फोन करून तो बारा लाख रूपयांची खंडणी मागत होता.
घरी बोलावून शिवीगाळ व दमदाटी करीत त्याने खंडणीची मागणी केल्याने खानकरी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.