इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या जागेवर भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या बातम्या साफ खोट्या आहे. त्याला कशाचाही आधार नसल्याचे सांगत मंत्री भजुबळ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गेल्या काही दिवसात भुजबळ कमळ चिन्ह घेऊन लढणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
राज्यातील बहुतांश ठिकाणी उमेदवार जाहीर झालेले असतांना नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा महायुतीत सुटला नाही. भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांनी या जागेसाठी आग्रह धरल्यामुळे रोज नवीन नवीन चर्चा समोर येत असतात. त्यात भुजबळ कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली. त्याचे भुजबळांनीच खंडण केले.
नाशिकच्या जागेसाठी अजित पवार यांनी आग्रह धरला. या जागेवरुन वरुन सुचना आल्या, मलाच उमेदवारी द्या असे सांगण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी याअगदोरच सांगितले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. पण, ही जागा नेमकी कोणाला सुटणार हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान महायुतीच्या जागेचा तिढा सुटला असून उद्या उमेदवारी घोषित केली जाईल असे सांगितले जात आहे.