इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात डॅा. शोभा बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असूनही आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगत असतांना त्यांचा कंठ देखील दाटून आला.
यावेळी सनेर म्हणाले की, पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर अन्याय झाला आहे. पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काँग्रेसने काल धुळे व जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यात धुळे – मालेगाव येथे माजी राज्यमंत्री डॅा. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. बच्छाव या नाशिकच्या माजी महौपार आहे. त्या नाशिक येथे राहतात. पण, त्यांचे माहेर बागलाण तालुक्यात तर सासर हे मालेगावचे आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, सनेर यांनी स्थानिकांना डावलल्याचा मुद्दा उपस्थितीत केला.
या मतदार संघात भाजपचे उमेदवार डॅा. सुभाष भामरे व वंचितचे अब्दुल रेहमान व काँग्रेसचे उमेदवार डॅा. शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत आहे.