मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रसने दोन लोकसभा मतदार संघातील नावे जाहीर केले आहे. त्यात धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री डॅा. शोभा बच्छाव तर जालना लोकसभा मतदार संघातून डॅा. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मतदार संघात अनेक नावांची चर्चा होती. त्याला पूर्ण विराम देत काँग्रेसने ही उमेदवारी जाही केली आहे. डॅा. शोभा बच्छाव या नाशिकच्या माजी महापौर आहे. त्याचे माहेर हे बागलाणमध्ये तर सासर मालेगावमध्ये आहे. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे – मालेगाव लोकसभा मतदार संघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दोन विधानसभा मतदार संघ व सटाणा विधानसभा मतदार संघाचा समावेश असल्यामुळे ही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून माजी मंत्री व विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या उमेदवारीमुळे नाशिकमध्ये सुध्दा आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नाशिक लोकसभा मतदार संघ ठाकरे यांच्याकडे, दिंडोरी राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे तर मालेगाव – धुळे लोकसभा काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात समसमान संधी तिन्ही पक्षाला मिळाली आहे.
जालन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार डॅा. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार तगडे असले तरी काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येणार आहे.