मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्याचे कमांड रुग्णालय या शस्त्रक्रियेमुळे ठरले देशातील पहिले सरकारी रुग्णालय

by Gautam Sancheti
एप्रिल 10, 2024 | 8:23 pm
in संमिश्र वार्ता
0
PIC12YM0X e1712760697982

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याच्या कमांड रुग्णालयाच्या (सदर्न कमांड) कान, नाक आणि घसा (ENT) विभागाने जन्मजात बाह्य आणि कानाच्या आतील विसंगतींनी ग्रस्त आणि मोठ्या प्रमाणावर श्रवणशक्ती कमी झालेल्या 7 वर्षाच्या मुलामध्ये तसेच एकाच कानाने बहिरेपण असलेल्या (SSD) एका प्रौढ व्यक्तीवर यशस्वी पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपण केले आणि अशाप्रकारचे प्रत्यारोपण करणारे हे रुग्णालय देशभरातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे.

कमांड रुग्णालयाचा (सदर्न कमांड) ENT विभाग हे AFMS चे नियुक्त न्यूरोटोलॉजी केंद्र आहे. हा विभाग अनेक वर्षांपासून अवलंबित्व असलेल्या ग्राहकांना श्रवणयंत्र बसवत आहे. ऍक्टिव्ह पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम्प्लांट सिस्टीम हे श्रवणदोष असलेल्या रूग्णांसाठी [कंडक्टिव्ह लॉस (ऑरल एट्रेसिया), दोन्ही कानाने किंवा एका कानाने बहिरेपणा] प्रत्यारोपण करण्यायोग्य वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. उपकरणांची किंमत नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे, ज्यामुळे त्याचा वापर मर्यादित स्वरूपात होतो.

कंडक्टिव्ह (ध्वनिलहरी कर्णपटलापर्यंत न पोहोचणे) /दोन्ही कानाने किंवा एका कानाने बहिरेपणा असलेले असे रुग्णांचे प्रकार आहेत, ज्यांना प्रत्यारोपण किंवा श्रवणयंत्र किंवा कानातील शस्त्रक्रियेने फायदा होत नाही. संबंधित अपंगत्व कमी करण्यासाठी, मुलांमध्ये चांगल्या शैक्षणिक परिणामासाठी आणि प्रौढांमधील सामाजिक जीवनासाठी श्रवणवृद्धी प्रदान करणे अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या अशा गटांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी बोन कंडक्शन रोपण हा निश्चित श्रवण उपाय आहे आणि सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांनी हे त्वरित अंमलात आणले.

सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेचे महासंचालक जनरल दलजीत सिंग आणि डीजीएमएस (लष्कर) लेफ्टनंट जनरल अरिंदम चटर्जी यांनी कमांड रुग्णालयाचे (एससी) अभिनंदन केले आहे आणि संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्नल (डॉ) राहुल कुरकुरे, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल (डॉ) नितू सिंग, वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी (ईएनटी) यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या कमांड रुग्णालयात (SC)या रूग्णांवर यशस्वी रोपण करण्यात आले. पुण्याचे कमांड रुग्णालय (SC), हे AFMS च्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे, सध्या मेजर जनरल बी नांबियार यांच्या नेतृत्वाखाली आहे. संपूर्ण AFMS मधील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून रुग्णालयाला नुकतेच सर्वात प्रतिष्ठित “रक्षा मंत्री” चषकाने सन्मानित करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हा परिषदमध्ये स्मार्ट PHC आढावा बैठक संपन्न…मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आढावा

Next Post

नाशिकला महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती मार्फत निघणार भव्य चित्ररथ मिरवणूक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 54

नाशिकला महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्सव समिती मार्फत निघणार भव्य चित्ररथ मिरवणूक

ताज्या बातम्या

bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011