इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील वाडीवऱ्हे येथे समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिद्धकला इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महिंद्रा कंपनीच्या सामाजिक दायित्वातून निर्माण झालेल्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उद्घाटन हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल महिंद्रा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुमित इस्सार, उपाध्यक्ष नोरा भाटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेता येतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या फ्युचरिस्टिक क्लासरूमच्या माध्यमातून आपल्याला काय बनायचे आहे ते ठरवून या संसाधनांचा वापर आपल्या शिक्षणासाठी करावा असे प्रतिपादन केले.
महिंद्रा एसेलो कंपनीच्या सामाजिक दायित्वातून इगतपुरी तालुक्यातील सिद्धकला इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार करण्यात आला आहे, या क्लासरूममध्ये एकावेळी २८ विद्यार्थ्यांना डिजिटल साधनातून अभ्यास करता येणार आहे. यासाठी २८ संगणकांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी सर्व अभ्यासक्रम टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध विषयांच्या प्रश्न पत्रिका, शालेय उपयोगी कोर्सचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर शाळेतील अद्ययावत विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील करण्यात आले या प्रयोग शाळेत महिंद्रा एसेलो कंपनीच्या माध्यमातून प्रयोग शाळा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.