इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघीडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या असून त्यापैकी ९ उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले. पण, माढा लोकसभा मतदार संघातील नाव जाहीर करण्यात आले नाही. आता हे नाव शनिवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली. येत्या शनिवारी हा पक्षप्रवेश होणार आहे, असे सांगितले जाते. त्यानंतर नावही जाहीर केले जाणार आहे.
हा प्रवेश सोहळा अकलूज येथील क्रीडा संकुलावर १३ तारखेला होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार आहेत. मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परतणे हा पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो. १३ तारखेला धैर्यशील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच दिवशी ते आपल्या नव्या राजकीय डावाला सुरुवात होणार आहे. या प्रवेश सोहळ्यात मात्र धैर्यशील यांचे बंधू, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मात्र उपस्थितीत राहणार नाही.
भाजपने माढा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबाचा विरोध असल्यामुळे हा प्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.