पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – लेव्हीबाबत तोडगा निघू न शकल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामधील कांदा लिलाव ठप्प झाला आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकरी व हमाल मापारी प्रतिनिधी आक्रमक झाले आहे. आज भाजपचे स्थानिक नेते यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
कांदा लिलाव पूर्ववत सुरु आग्रही मागणी केली. तर खासगी कांदा खरेदी विक्री केंद्रा तीव्र विरोध केला. लिलाव पूर्ववत न झाल्याने खासगी खरेदी विक्री बंद पडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.