नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यात एका १९ वर्षीय तरूणीचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. कुंकूम रितेश कोळी (१९ रा.कारगील चौक,दत्तनगर अंबड) या युवतीने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्यास गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ गणेश कोळी यांनी तिला तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुस-या घटनेत प्रविण आण्णासाहेब जाधव (५० मुळ रा.कसबे सुकेणे ता.निफाड हल्ली बाय रेसि.दामोदरनगर,पाथर्डीफाटा) यांनी मंगळवारी आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून त्यांनी गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. परिसरात दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पुष्कर कुकवळकर यांनी खबर दिल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.