नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मित्रांमध्ये कशावरुन भांडण होईल व ते टोकाचे केव्हा जाईल हे सांगत येत नाही. नाशिकमध्ये हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून मित्रांमध्ये झालेल्या हाणामारी झाली. त्यानंतर एकावर चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत तरूण जखमी झाला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम काजळे,ऐश्वर्या आडगावकर व अन्य दोन साथीदार अशी मित्रावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत तवीन दिनेश ठक्कर (२३ रा.सहदेवनगर,हल्ली लिलावती हॉस्पिटल शेजारी म.बाद) या युवकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित एकमेकांचे मित्र असून ते सोमवारी (दि.८) सायंकाळी जेवण करण्यासाठी शरणपूररोड येथील एका हॉटेलमध्ये गेले होते.
जेवण आटोपल्यानंतर हॉटेलचे बिल एकाने पेड केले. यानंतर हॉटेल बाहेर येवून सर्व मित्र एकत्रीतरित्या बिलाची रक्कम जमा करीत असतांना त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात झटापटी झाली. या घटनेत एकाने ठक्कर याच्यावर चाकू सारख्या धारदार वस्तूने वार केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार संजय शिंदे करीत आहेत.