इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने लोकसभा निवडणुकीसाठी दहावी यादी प्रसिध्द केली असून त्यात महाराष्ट्रातील एकाचेही नाव नाही. राज्यातील सातारा येथून उद्यनराजे भोसले तर रत्नागिरीतून नारायण राणे यांच्या नाव जाहीर होणार असल्यामुळे भाजपच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, या यादीत हे दोन्ही नावे नाही.
भाजपने जवळपास राज्यातील उमेदवार घोषित केले आहे. काही जागांवर निर्णय बाकी असल्यामुळे या ठिकाणी अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही यादी नेमकी केव्हा येते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
यादीत बहुतांश उत्तरप्रदेशचे उमेदवार
भाजपने जाहीर केलेल्या यादीत ९ उमेदवारांची नावे असून त्यात ७ उमेदवार उत्तर प्रदेश, १ चंदीगड व १ पश्चिम बंगाल येथील आहे. यात इतर ठिकाणांचे उमेदवार अदयाप नाही.