नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सीटी सेंटर मॉल ते इंदिरानगर बोगदा दरम्यान स्पिड ब्रेकरवर दुचाकी घसरल्याने २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. सौरभ हंसराज गुप्ता (रा.विठ्ठल मंदिराजवळ,राजीवनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सौरभ गुप्ता मंगळवारी (दि.९) सकाळच्या सुमारास सिटी सेंटर मॉलकडून इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होता. आरडी सर्कल भागातील स्पीड ब्रेकर लक्षात न आल्याने हा अपघात झाला. भरधाव दुचाकी स्पीड ब्रेकरवर घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
नातेवाईक सतिश खंडेलवाल यांनी त्यास तात्काळ लाईफ केअर हॉस्पिटल मार्फत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.