नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात सहा जणांचा बुडून मृत्य झाल्याची घटना घडलेली असतांना नाशिकमध्ये शहर व परिसरात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा नदीपात्रात तर दुस-याचा शेततळय़ात पायघसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना गौळाणे शिवारात घली. प्रविण संपत घायवट (३५ रा.गौळाणेरोड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घायवट मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास क्लेमेन्ट फार्म हाऊस परिसरातील शेततळ््यात माश्यांना खाद्य टाकत असतांना ही घटना घडली. पाय घसरून पडल्याने तो मासे पकडण्याच्या जाळ््यात अडकला होता. या घटनेत नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत भाऊ राहूल घायवट याने दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.
दुस-या घटनेत शेवगे दारणा येथील शरद उर्फ उत्तम कचरू पाळदे (३४) याचा मंगळवारी (दि.९) सकाळच्या सुमारास चेहडी पंपीग परिसरातील धोबी मळा येखीव चेहडी बंधारा फुगवट्यात मृतदेह आढळून आला. नदीपात्रात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची संशय असून स्थानिकांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यास पाण्याबाहेर काढले. याबाबत कचरू पाळदे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.