इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदार संघात शिवसेना उध्दव ठाकरे गटाला जागा महाविकास आघाडीने सोडल्यानंतर या मतदार संघात काँग्रेसचे विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण, आता ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी घेण्याची शक्यता आहे.
आज सकाळी विशाल पाटील यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा केली. या भेटीची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी चर्चा केली असून ते लवकरच निर्णय घेतील असे सांगितले.









