सोमवार, ऑगस्ट 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उमेदवारांना प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहिती तीन वेळा अशी प्रसिध्द करावी लागणार…

by Gautam Sancheti
एप्रिल 10, 2024 | 1:19 pm
in राज्य
0
Election logo nivdnuk aayog e1702627232547

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील जारी केले आहेत. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी निवडणूक आयोगाने विहित केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. उमेदवाराविरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती देतांना ती ठळक स्वरूपात असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असेल तर अशा उमेदवारांनी त्यांच्या विरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती संबंधित पक्षास देखील अवगत करावी. राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांवरील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीस वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे देखील प्रसिद्धी देणे आवश्यक असून अशी प्रसिद्धी निवडणूक कालावधीत आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात किमान तीन वेळा द्यावयाची आहे.

आयोगाने विहित केलेल्या C-1 नमुन्यात वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे उमेदवारांनी प्रसिद्धी द्यावी. तसेच राजकीय पक्षांनी त्यांचेसाठी विहित केलेल्या C-2 नमुन्यात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॅानिक मीडिया आणि पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी द्यावी.
प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीची तीन वेळा प्रसिद्धी आयोगाने आखून दिलेल्या विहित वेळापत्रकानुसारच करण्यात येईल याची दक्षता संबंधित उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी घ्यावी. प्रथम प्रसिद्धी उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसातच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसात करावी आणि तिसरी प्रसिद्धी 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत करावी. उमेदवाराविरूद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरील Know Your Candidate या लिंकवर देखील उपलब्ध राहील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी या सूचनांची नोंद घ्यावी आणि याबाबत अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ…काँग्रेसच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

Next Post

सांगलीत नाराज काँग्रेसचे उमेदवार वंचितची उमेदवारी घेणार…प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
vanchit

सांगलीत नाराज काँग्रेसचे उमेदवार वंचितची उमेदवारी घेणार…प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल, जाणून घ्या, सोमवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 10, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

बिबट्याच्या हल्ल्यात मृतकच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द…

ऑगस्ट 10, 2025
IMG 20250808 WA0367 2 e1754829983694

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून स्वायत्त दर्जा…नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय

ऑगस्ट 10, 2025
प्रातिनिधिक फोटो

आता अहिल्यानगर-पुणे नव्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न…शंभर ते सव्वाशे किलोमीटर अतंर कमी होणार

ऑगस्ट 10, 2025
modi 111

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १८४ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन…

ऑगस्ट 10, 2025
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांचे फोटो 1 1024x683 1 e1754819420411

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….या स्थानकावर थांबे

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011