मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यात सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदे तर रावेर मतदार संघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार गटाला एकुण १० जागा मिळाल्या असून आतापर्यंत ९ जागेवरील उमेदवार त्यांनी घोषीत करण्यात आले आहे. तर माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा अजून बाकी आहे. या ठिकाणी उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अद्याप बाकी आहे.
ही यादी प्रसिध्द करतांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने म्हटले आहे की, तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! असे म्हटले आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या ९ उमेदवारांची यादी अशी आहे.