इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळ : अल्पवयीन बालक किंवा बालिकेवर अत्याचार लैंगिक अत्याचार झाले तर त्या संदर्भातील फोटो किंवा नाव प्रसिद्ध करण्यात येऊ नये, असा न्यायालयाने नियम तथा दंडक घालून दिला आहे. या नियमाचे काटेकोर पालन सर्वांनी करणे गरजेचे ठरते. मात्र काही जण हव्यासापोटी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर फोटो आणि नावे देखील व्हायरल करतात, त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. विदर्भातील यवतमाळ मध्ये एका बालिका लैंगिक अत्याचार झाले होते. या प्रकरणी आरोपीला शिक्षा देखील करण्यात आली. दरम्यानच्या काळात एका पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या महिला डॉक्टरने संबंधित बालिकेचे पीडित संबंधित बालिकेचे फोटो व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली, आता त्या महिला डॉक्टरवर कारवाई करण्यात येत आहे, मात्र दरम्यान तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
फोटो सोशल मीडियात व्हायरल
उमरखेड येथे एका बालिकेवर सराईत गुन्हेगाराने अत्याचार केला. दरम्यान एका सताधारी पक्षाशी संबंधित डॉ. सायली शिंदे यांनी प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी पीडित बालिकेच्या सांत्वनपर भेटीचे छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांत व्हायरल केली. न्यायालयाने त्या महिलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिची रवानगी कारागृहात केली आहे. उमरखेड तालुक्यातील ४ दिवसा पूर्वी एका ११ वर्षीय बालिकेला वाटेत अडवून दुचाकीवरून शाळेत सोडून देण्याचा बहाणा विकृत नराधमाने केला. त्यानंतर शाळेत न सोडता निर्जनस्थळी नेत त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही घटना पुढे आल्यानंतर त्या नराधम तरुणाला अवघ्या १२ तासांत पोलिसांनी गजाआड केले
स्थानिकांनी केली तक्रार
पीडित बालिकेचे भेटी दरम्यानचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. ही बाब स्थानिक लक्ष्मीकांत मैड नामक व्यावसायिकाच्या लक्षात येताच त्याने उमरखेड पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. डॉ. सायली शिंदे यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अन्य कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.