नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयित राजरोसपणे शहरात वावरतांना मिळून आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल दिलीप जाधव (२५ रा.भाग्यलक्ष्मी अपा.मोतीवाला कॉलेज मागे,ध्रुवनगर) असे संशयित तडिपाराचे नाव आहे.
जाधव याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर व जिह्यातून दोन वर्षा साठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.८) दुपारी तो गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल येथील मयुर अलंकार ज्वलर्स या दुकानासमोर मिळून आला.
याबाबत अंमलदार गोरख साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गिरीष महाले करीत आहेत.