इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. त्यांनी ईडीने केलेल्या अटकेविरुध्द याचिका दाखल केली होती. त्यात कोणताही दिलासा केजरीवाल यांना मिळाला नाही. या निर्णयानंतर आम आदमी पक्षाने आम्ही निर्णयाशी सहमत नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. केजरीवाल उद्याच सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात असे म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उत्पादन शुल्क धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की ईडीने गोळा केलेल्या सामग्रीवरून अरविंद केजरीवाल यांनी इतरांसोबत कट रचल्याचे स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे.