इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंगोलीः महायुती व महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी जागा वाटपात नाराजी समोर येत आहे. त्यातून काही लोकसभा मतदार संघात बंड होणार हे निश्चित आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे बाबूराव कदम हे महायुतीचे उमेदवार असले, तरी भाजप नेते शिवाजी जाधव यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. संकटमोचक गिरीश महाजन यांनी जाधव यांच्याशी चर्चा करून उमेदवारी मागे घेण्यास सांगूनही ते ऐकायला तयार नाहीत.
हिंगोली मतदारसंघात महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, श्याम भारती महाराज यांच्यासह भाजप नेते शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
महाजन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळाने सुमठाणकर आणि श्याम भारती यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यांना माघार घ्यायला लावली. महाजन यांनी जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतरही जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.