मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडली. मात्र स्वार्थासाठी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्या मताला काही किंमत राहिली नसून, त्यांची निव्वळ फरफट होत असल्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीचा प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्य आज एका नव्या उमेदीने प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचावली जात आहे. त्यामुळे यापुढील काळात शिवसेनेचे भूमिका जोरकसपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेता आणि सह-मुख्यप्रवक्तेपदी नियुक्ती करत असल्याचे यावेळी जाहीर केले.