नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा नाका भागात उंचावरून पडल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गेली दोन महिने सदर व्यक्तीवर उपचार सुरू होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अशोक पंजाबी (रा.बी पॅराडाईज प्लाझा, जैन मंदिराजवळ शिंगाडा तलाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पंजाबी गेल्या १० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास वडाळा नाका भागातील साई प्रितम हॉटेल परिसरात असलेल्या ५ ते ६ फुट उंचावरून जमिनीवर पडले होते. या घटनेत त्यांच्या मानेस व गुडघ्यास गंभीर दुखापत झाली होती.
सुयश हॉस्पिटल येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येवून अधिक उपचारार्थ त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते. दोन महिन्यांच्या उपचारादरम्यान सोमवारी (दि.८) त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक भोये करीत आहेत.