मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीत मनसे – भाजप युती होईल अशी चर्चा होती व ती अजूनही आहे. पण, त्यानंतर मात्र युती झाली की नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे शिवतीर्थावर होणा-या आजच्या सभेत मोठे खुलासे राज ठाकरे करणार असल्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅडलवरुन गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॅान्च केला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय ..हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे. अशा कॅप्शनसह राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर पोस्ट केला आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे काय निर्णय़ घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेसाठी मनसेला महायुतीमध्ये थेट सामील केल्यास मुंबईमधील उत्तर भारतीय मतांवर परिणाम होण्याची भीती भाजपला वाटते. उत्तर प्रदेशमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेत राज्यसभेची एक, तर विधान परिषदेची एक अशा दोन जागा देऊन मनसेला महायुतीमध्ये आणण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याचे बोलले जात आहे.
पण, महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेला वाद लक्षात घेत राज ठाकरे महाखिचडीत स्वतःला झोकून देण्याची शक्यता नाही असेही बोलले जात आहे.