इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीचे गुढीपाडव्याचे मुहूर्तावर आज जागा वाटप जाहीर केले आहे. राज्यातील ४८ जागा पैकी ठाकरे गट २१, शरद पवार गट १० तर काँग्रेसला १० जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे तर भिवंडीची जागा ही शरद पवार गटच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटाप जाहीर करण्यात आले.
शिवसेना – एकुण जागा २१
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य.
काँग्रेसच्या जागा – एकुण जागा १७
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर.
राष्ट्रवादी – एकुण जागा १०
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.