मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे उद्योजक श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित झाले. सोमवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित करण्यात आले. भाजपच्या विद्यामान खा. रक्षा खडसे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपची वाट धरल्यानंतर या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यावी यावर बरंच खल झाल्यानंतर अखेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. दुपारीच सातारा लोकसभा मतदार संघात शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाले. त्यानंतर रावेरच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाले.
आता पवार गटातर्फे माढा लोकसभा मतदार संघातील नाव निश्चित होणे बाकी आहे. आज त्याही नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.