नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंधरा कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी २२ हजाराची लाच घेतांना मालेगाव येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र बळीराम दहीते (५४) यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते सामाजिक कार्य ही करतात. तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील १५ गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्ड ची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दिनांक 4/4/24 रोजी मालेगाव येथील रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्यासंदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे पंधराशे रुपये याप्रमाणे एकूण १५ कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण २२ हजार ५०० रुपयाची पांचासमक्ष मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व 08/04/2024 रोजी पंचांसमक्ष २२ हजार ५०० रुपयाची पैकी ५०० रू तक्रारदार यांना परत करून २२ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -* नाशिक
तक्रारदार- पुरुष, 54 वर्षे
आलोसे– 1) रवींद्र बळीराम दहीते वय 55 वर्षे, अव्वल कारकून, नेमणूक – धान्य वितरण अधिकारी कार्यालय, मालेगाव रा. 16, जयहिंद कॉलनी, चर्च मागे, मालेगाव कॅम्, मालेगाव जिल्हा नासिक
*लाचेची मागणी दिनांक :- 04/04/2024 रोजी
*लाचेची मागणी रक्कम :- 22,500/- रुपये,*
*लाच स्वीकारली दिनांक- 08/04/2024 रोजी
*लाच स्वीकारली – 22,000/- रुपये
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते सामाजिक कार्य ही करतात. तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील 15 गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्ड ची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दिनांक 4/4/24 रोजी मालेगाव येथील आलोसे रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्यासंदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे 1500/- रुपये याप्रमाणे एकूण 15 कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण 22,500/- रुपयाची पांचासमक्ष मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व
दिनांक 08/04/2024 रोजी पंचांसमक्ष 22,500/- रुपये पैकी 500 रू तक्रारदार यांना परत करून 22,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .जिल्हाधिकारी नाशिक
सापळा अधिकारी
अनिल बडगुजर, पोलीस उप आधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 8999962057
सापळा पथक–
*पोलीस नाईक/ दिपक पवार
*पोलीस शिपाई/ संजय ठाकरे
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .