प्रशांत चौधरी, नाशिक
गुढीपाडवा या दिवशी सकाळी अभंग स्नान करून गुढी उभारावी, ब्रह्म ध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे, ब्रह्म ध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रद, प्राप्तेस्मिन्वत्सरे नित्य मद्गृहे मंगलम करू या मंत्राने प्रार्थना करून नंतर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सफल वाचावे व सर्वांना ऐकवावे
सोन्याच्या वस्तू कोणत्या लोकांनी घालाव्यात किंवा घालू नये व त्याचे फायदे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जाणून घेऊ
- जर कुंडली मधील गुरु अशुभ स्थितीत असेल तर सोने धारण करू नये
- बाहेरची एलर्जी श्वसनणासंबंधीचा विकार असेल तर कनिष्ठ बोटामध्ये अंगठी घालावी
- गरोदर महिलांनी सोने धारण करू नये अशी सुद्धा मान्यता आहे
- वृषभ मिथुन कन्या आणि कुंभ लग्न असणाऱ्या जातकांसाठी सोने धारण करणे शुभ ठरत नाही
- ज्यांचा व्यवसाय लोखंडाशी , तेलाशी संबंधित असेल अशा व्यक्तींनी सोने धारण करू नये
- डाव्या हातात सोने धारण केल्यास त्रास होतो
- सोन्याचे दान किंवा सोन्याची वस्तू आपल्या प्रियजनांनाच भेट द्यावी
- सोन्याची पैंजण पायात घालू नये
- तसेच कमरे भोवती सोने धारण करू नये
- घरातील ईशान्य व नैऋत्य कोपऱ्यात सोने ठेवल्यास उत्तम लाभ मिळतात
- वृश्चिक आणि मीन लग्नाच्या जातकांनी सोने धारण केल्याने मध्यम प्रमाणात शुभता प्राप्त होते
- मेष कर्क सिंह आणि धनु लग्न असणाऱ्या जातकांनी सोने घातले तर त्यांना चांगले फायदे मिळतात
- तूळ आणि मकर लग्न असणाऱ्या जातकांनी शक्यतो सोने किंवा त्याचे दागिने न घालने उत्तम
- सोन्यामध्ये बराच शुभ तसाच अशुभ प्रभाव असतो त्याद्वारे आपल्या भाग्योदय होऊ शकतो किंवा भाग्य रुसु शकते. म्हणून सोने धारण करताना वरील नियम पाळले तर त्याचा लाभ होतो
- गुढीपाडव्याला पती-पत्नीने एकमेकाला मध किंवा मलई पेढा खाऊ घातल्यास त्यांच्यामध्ये भांडणे होत नाही उपाय छोटा पण असरदार करून बघा व रिप्लाय द्या
- या दिवशी पत्नीने पतीला व पतीने पत्नीला एखादी सेंटची बाटली भेट दिली तर प्रेमाचा ओलावा कायम राहतो
- गुढीपाडव्याच्या दिवशी जोडी ने आई वडील, सासू-सासरे यांना साष्टांग नमस्कार केल्यास सूर्य व चंद्र मजबूत होतात
- श्री लक्ष्मीनारायण अर्पणमस्तु