इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावमध्ये खडसे महाजन वाद हा नवा नाही. एकमेकांवर टीका करण्याची हे दोन्ही नेते संधी सोडत नाही. आता एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा रंगलेली असतांना मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधत खडसे एक विझलेला दिवा आहे असे सांगत बोचरी टीका केली.
महाजन म्हणाले की, खडसे एका विझलेल्या दिव्यासारखे आहेत. त्यांच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही. पत्नी व मुलीचाही पराभव झाला आहे. एका बँक त्यांच्या ताब्यात होती. परंतु आता संचालक मंडळ बदलले आहे. संचालक मंडळाचे नवे सदस्य त्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. परंतु पक्षाने याबाबत अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही असे सांगत अप्रत्यक्षपणे प्रश्न निर्माण केला आहे.
खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानतंर महाजन व खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते अजूनही खडसे यांच्यावर नाराज असून त्यांनी खडसे यांच्या प्रवेशापूर्वीच हातचे राखून नाराजी व्यक्त केली आहे.