इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
साताराः सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात भाजपतर्फे उदयनराजे भोसले यांची जवळपास उमेदवारी निश्चित आहे. अद्याप घोषणा झालेली नाही. पण, त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे.
साताऱ्यात महाविकास आघाडीतर्फे अनेक नावे चर्चेत होती. पण, शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. शिंदे १५ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उदयनराजे आणि शिंदे यांच्यात दुरंगी लढतीची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी येथे सक्षम उमेदवार द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.