नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. पंचवटीतील साईनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरटयांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व देवघरातील मुर्त्यां चोरुन नेल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद शामराव कुलकर्णी (रा.सिध्दीविनायक नगर,त्रिमुर्ती बंगल्यामागे,साईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटुंबिय शनिवारी (दि.६) सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवघरातील चांदीच्या व पितळाच्या मुर्त्या असा सुमारे ७२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.