नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर पाथर्डी मार्गावर पोलीस कारवाईतून छोटा हत्ती टेम्पोमधून जर्सी गायीची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गायीची सुटका करीत सुमारे १ लाख ६० हजाराचा टेम्पो जप्त केला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन अफजल कुरेशी (२३ रा.वडाळानाका द्वारका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अंमलदार दिपक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. वडनेर पाथर्डी रोडवरून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार रविवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास पथकाने सिलींग पॉईंट भागात सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयायात अडकला. तो एमएच १५ जीव्ही ७१७६ या मारूती कंपनीच्या सुपर कॅरी टुर्बो या वाहनातून जर्सी गायीची वाहतूक करतांना मिळून आला. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.